
"हिरवाईची शान, कष्टकऱ्यांची ओळख – आमचे निमगाव"
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०१.०१.१९५२
१३७२
हेक्टर
६५१
एकूण क्षेत्रफळ
एकूण कुटुंबे
ग्रामपंचायत निमगाव,
मध्ये आपले स्वागत आहे...
एकूण लोकसंख्या
स्वागत!
ग्रामपंचायत निमगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे – 410505 हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असे बारा मल्हार पैकी एक असणारे श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा ते तीर्थक्षेत्र आहे. निमगाव खंडोबा तेथे खंडोबा देवस्थान असल्याने वर्षभर लाखो भाविक भक्त येथे देव दर्शनासाठी येत असतात. तसेच वेगाने विकसित होत असलेले गाव आहे. खेड सिटी (sez) औद्योगिक परिसर असल्याने गावाने ग्रामीण शांतता आणि औद्योगिक प्रगती यांचा समतोल साधलेला आहे. निमगाव गावाची मुख्य ओळख शेती, दुग्धव्यवसाय व स्थानिक रोजगारावर आधारित असून आधुनिक उद्योगांच्या उपलब्धतेमुळे ग्रामस्थांना रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होत आहेत.
गावामध्ये शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यांसारख्या मूलभूत सुविधांचा सातत्याने विकास होत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, हरित निमगाव उपक्रम, तसेच लोकसहभागातून विविध विकासात्मक योजना राबविण्यात येत आहेत.
पारदर्शक प्रशासन, नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि सर्वांगीण विकास हे ग्रामपंचायत निमगावचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायत निमगाव ही परंपरा, प्रगती व पर्यावरण यांचा सुंदर संगम जपणारी आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणारी आदर्श ग्रामपंचायत आहे.
जलव्यवस्थापन, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी सतत प्रयत्नशील.
३२७३
सरकारी योजना
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.
शासनाच्या सर्व योजना जाणून घेण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
हवामान अंदाज








